पैठण, (प्रतिनिधी) : जिल्हाधिकारी कार्यालय येथे गुरुवारी आमदार विलास भुमरे यांच्या अध्यक्षतेखाली पैठण विधानसभा मतदारसंघातील महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, पैठण-आपेगाव विकास प्राधिकरण, नगर परिषद तसेच पुरातत्त्व विभागांतर्गत सुरू असलेल्या विविध विकासकामांचा सविस्तर आढावा घेण्यासाठी जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या प्रमुख उपस्थितीत. बैठक घेण्यात आली.
या बैठकीत आमदार विलास भुमरे यांनी महत्त्वाचे प्रश्न उपस्थित करून संबंधित विभागांना तातडीने कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. पैठण शहरातील एसटीपी प्रकल्प, ड्रेनेज लाईन व सांडपाणी व्यवस्थापनाची कामे अर्धवट आहेत ती कामे कधी पूर्ण होणार? महाराष्ट्र जीवन प्राधिकरणांतर्गत सुरू असलेल्या पाणीपुरवठा योजनांची प्रगती, निधी
व प्रलंबित कामांचा सविस्तर आढावा घेतला. पैठण नगर परिषद हद्दवाढ प्रस्तावाची प्रशासकीय कार्यवाही करण्यासाठी संबंधित अधिकारी यांना सूचना दिल्या.
पैठण आपेगाव विकास प्राधिकरणांतर्गत टप्पा क्रमांक ३ विकासकामांची प्रगती आणि प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करण्याबाबत हि सूचना दिल्या. पुरातत्त्व विभागाच्या अखत्यारीतील बारव, प्राचीन मंदिरे व ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन, दुरुस्ती आणि पर्यटन विकासासाठी आवश्यक उपाययोजना बाबत सूचना दिल्या.
कै. बाळासाहेब पाटील वस्तुसंग्रहालयाच्या विस्तारीकरणाचा प्रस्ताव, निधी उपलब्धता व कामाची
अंमलबजावणी लवकरात लवकर करण्यात यावीअशी मागणी केली. सर्व विभागांनी परस्पर समन्वय ठेवून गुणवत्तापूर्ण, वेळेत आणि नियोजनबद्ध पद्धतीने विकासकामे पूर्ण करण्याबाबत निर्देश दिले आहे. यावेळी जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना प्रलंबित कामे निश्चित कालावधीत पूर्ण करून नागरिकांना दर्जे दार सुविधा उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या.
बैठकीस महाराष्ट्र जीवन प्राधिकरणचे अधिकारी, पैठण आपेगाव विकास प्राधिकरणाचे अधिकारी, नगर परिषद, पुरातत्त्व विभाग तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. याच बरोबर बांधकाम विभागाचे सहाय्यक अभियंता राजेंद्र बोरकर, शेळके, तहसीलदार ज्योती पवार मुख्याधिकारी पल्लवी अंभोरे, व्यंकटी पापूलवार, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख विनोद बोंबले, राज्य दूध संघाचे संचालक नंदलाल काळे, अप्पासाहेब पाटील निर्मळ, नगर परिषदचे उपनगराध्यक्ष तुषार पाटील, माजी नगरसेवक भूषण कावसनकर, प्रा. संतोष गव्हाणे, अजित पगारे, जि. प. सदस्य पांडुरंग औटे, सतीश आंधळे, नामदेव खरात, अनिकेत धारकर, कृष्णा मापारी आदींची उपस्थिती होती.













